93 पोलीस उमेदवारांची नियुक्ती तर 59 चालक पोलीस उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश. जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय
93 पोलीस उमेदवारांची नियुक्ती तर 59 चालक पोलीस उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश. जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय.
-----------------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------------------
कोल्हापूर -: कोल्हापूर जिल्हयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती-२०२२-२३ मधील रिक्त असलेल्या १५४ पोलीस शिपाई पदासाठी मैदानी व लेखी परीक्षेमध्ये पात्र १४८ उमेदवारांची अंतीम निवड यादी दि.२७.०७.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, चारित्र्य व पुर्वइतिहास पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी व समांतर आरक्षणाची कागदपत्रे पडताळणी साठी संबधीत विभागास पाठविण्यात आलेली होती. संबंधीत विभागाकडून पडताळणी अहवाल प्राप्त झालेल्या पात्र ९३ उमेदवारांना २३.०८.२०२४ रोजी नियुक्ती आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते देण्यात आले आहेत. उर्वरीत उमेदवारांचे पडताळणी अहवाल प्राप्त होतील त्यानुसार लवकरच नियुक्ती दिली जाणार आहे. तसेच चालक पोलीस शिपाई भरतीमधील ५९ उमेदवारांचे नियुक्ती आदेशही लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे
Comments
Post a Comment