नरंदे हायस्कूल नरंदे मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

 नरंदे हायस्कूल नरंदे मध्ये 78  वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

-------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-------------------------------

नरंदे येथील श्री नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे  हायस्कूल नरंदे व देशमुख इंग्लिश मेडीयम स्कूल*या निवासी अनिवासी  संकुलामध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विजयसिंह देसाई ( सदस्य, डोंगरी विकास कार्यक्रम, कोल्हापूर जिल्हा )  यांच्या शुभ हस्ते, मा.बाळासाहेब माने ( मा.सदस्य शेती उत्पन्न बाजार समिती, पेठ वडगाव ),प्रमुख उपस्थिती मा. प्रतापराव देशमुख सो, (  संस्थापक अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य )मा. श्री. प्रकाशराव भंडारी, ( सामाजिक कार्यकर्ते )संस्थेच्या सेक्रेटरी सौ.नमिताताई देशमुख, चि. हर्षवर्धनदादा देशमुख, उपाध्यक्ष, नागनाथ एज्युकेशन सोसायटी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला .

आपल्या भाषणात बोलताना श्री. देसाई यांनी  यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा इतिहास, देशाची प्रगती , देशभक्ती, कर्तव्य, हर घर तिरंगा उपक्रम ह्या बद्दल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना देशाचा अभिमान ठेवावा, आपली जबाबदारी पार पाडावी असे सांगून शाळेतील उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

आपल्या भाषणात बोलताना मान.प्रतापराव देशमुखसो यांनी आझादी का अमृत महोत्सव, गौरवशाली भारत,  त्याचा इतिहास, जिद्द, परिश्रम, कष्ट ह्या बाबतीत मार्गदर्शन करून, आपण देशसेवेत कार्यरत व्हावे, आई वडिलांचे नाव करावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात राष्ट्रभक्तीपर गीते , भाषणे समूह गीते आणि पोवाडे सादर करण्यात आले . ह्या निमित्ताने नरंदे गावातून रॅली काढण्यात आली.  मुलांनी परेड सादर केलेत . स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात  सन 2023 - 24 शैक्षणिक वर्षातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना व इयत्ता 10 वी मार्च 2023 परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना अंतर्गत 12 मुलींना ड्रेस वाटप करण्यात आले. निवासी पालक श्री.संजय माने यांनी प्रशालेतील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना 100 वह्या व पेन भेट दिले.तसेंच विद्यार्थ्यांना मिठाई वाटप कारण्यात आले.

कार्यक्रमास मुख्याध्यापक बी. एस. खोत यांच्यासह सर्व शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी  व विद्यार्थी, माजी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.आर शिंदे व क्रीडा शिक्षक श्री.एस.सी.साळुंखे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक बी.एस.खोत यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.