शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 37 वा स्मृतिदिन साजरा.

 शिक्षणमहर्षी  डॉ. बापूजी साळुंखे यांचा 37 वा स्मृतिदिन साजरा.

------------------------------------

कोल्हापूर  प्रतिनिधी

पांडुरंग फिरिंगे 

------------------------------------

आगामी 25 वर्षाच्या अमृतकाळात शिक्षकांनी सीमेवरील सैनिकाप्रमाणे कष्ट केल्यास भारत महासत्ता होईल.  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने विवेकानंद विद्यापीठाची स्थापना करुन बदलत्या शैक्षणिक धोरणात राष्ट्रीय भूमिका घ्यावी . भारतीय ज्ञानपरंपरा आणि कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम यामुळे आपला भारत विकसनशीलतेकडून विकसीत भारताकडे जाण्यासाठी उच्च्‍ शिक्षण संस्थांची भूमिका महत्व्‍पूर्ण राहणार आहे.  भारताला मानव संसाधनाचे महत्वाचे ठिकाण बनवायचे असेल तर आपले उच्च शिक्षण गुणवत्तापूर्ण, वैविध्यपूर्ण घडविण्याची गरज आहे.  देशातील पालकांना गुणवतापूर्ण शिक्षण हवे आहे. आपल्याकडे  गुणवत्ता शिक्षण नसल्याने मोठया प्रमाणात परदेशी जाणारा विद्यार्थी ही समस्या आहे. जगातील सर्वात मोठी युवाशक्ती भारताकडे आहे.  म्हणून आपल्या देशात  पायाभुत सुविधा आणि मानव संसाधने समृध्द करण्यासाठी कटिबध्द् कार्यक्रम राबविले जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात महाराष्ट्र राज्य्‍ देशात एक नंबरवर आहे.  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ब्रँण्ड् ॲम्बॅसिडर बनविण्यासाठी उच्च्‍ शिक्षण विभाग कंबर कसत आहे. असे मत  उच्च शिक्षण संचालक, डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मांडले.



शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 37 व्या स्मृतिदिन निमित्त्‍ा आयोजित  विकसित भारत व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर  प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.


संपन्न्‍ झाले.  या कलाप्रदर्शनात रेखाचित्र, हस्तकला, शिल्पकला यासारख्या 100 हून अधिक कलाकृतींची मांडणी करण्यात आली होती.


  स्वागत व प्रास्ताविक करताना  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे म्हणाले, डॉ.बापूजी साळुंखे यांनी लावलेल्या ज्ञानाच्या रोपटयाचा ज्ञानवटवृक्ष झालेला आहे.  शब्दांचे धन मानून गुरुदेव कार्यकर्ते ज्ञानार्जन करीत आहेत.  कृत्रिम बुध्दीमत्ता, संगणक, आधुनिक तंत्रज्ञान यांची सोबत करत संस्था दर्जात्मक विकास साधत आहे. याचा अभिमान वाटतो.   




कार्यक्रमाची सुरवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी श्री महेश हिरेमठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थना व भक्तीगीते सादर केली.  कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सहसचिव (अर्थ) मा. श्री सिताराम गवळी यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील, प्रा.समीक्षा फराकटे  यांनी केले. याप्रसंगी संस्थेच्या विविध शाखेतील गुरुदेव कार्यकर्ते, प्राचार्य, आजी-माजी पदाधिकारी, आजीव सेवक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.