रस्ता नाही तर टोल नाही आंदोलन- 25% रक्कम टोलमधून सुट देण्याची ग्वाही.
रस्ता नाही तर टोल नाही आंदोलन- 25% रक्कम टोलमधून सुट देण्याची ग्वाही.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
-----------------------------------------
पुणे बेंगलोर महामार्गाच्या दुरावस्थेविषयी काँग्रेस पक्षाच्यावतीने 'रस्ता नाही तर टोल नाही' आंदोलन जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली किणी टोल नाका येथे करण्यात आले. काँग्रेस नेत्यांच्या मागणीची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सहापदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलच्या रक्कमेत 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेत आणखी 25 टक्के कपात करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करू अशी हमी दिली. हे काँग्रेसच्या आंदोलनाचे यश असले तरी रस्त्याच्या कामात सुधारणा होईपर्यंत आपला पाठपुरावा राहणार असे सांगण्यात आले
दरम्यान सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अनेक वाहने टोल शिवाय सोडली. तसेच आक्रमक भुमिका घेत काही काळ महामार्ग ठप्प केला.
आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतूराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, सांगलीच्या जयश्री पाटील, राहुल पाटील, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, सचिन चव्हाण, संजय कांबळे, राहुल खंजिरे, भगवानराव जाधव, भारती पोवार, शशिकांत खवरे, उत्तम सावंत , दीपक लंबे उत्तम पाटील, राजेंद्र सुतार , ज्योतिराम पोर्लेकर ,अभिजित गायकवाड, बाजीराव सातपुते, , कपिल पाटील, सचिन चव्हाण आदी काँग्रेस कार्यकर्ते तसेच विविध ट्रान्सपोर्ट संघटनाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपसथित होते
Comments
Post a Comment