राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 16 कोल्हापूर येथे क्रीडा स्पर्धांचे मोठ्या उत्साहात आयोजन.
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 16 कोल्हापूर येथे क्रीडा स्पर्धांचे मोठ्या उत्साहात आयोजन.
-------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
-------------------------------
समादेशक नम्रता पाटील (भापोसे ) यांचे मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 16 कोल्हापूर येथे पोलीस जवानांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकी, फुटबॉल, खोखो, कबड्डी, बास्केटबॉल हे सांघिक खेळ व रनिंग, रिले, गोळा फेक इ. अनेक खेळांचे आयोजन केले होते.
खेळ हे आरोग्यासाठी महत्त्वाची शिदोरी असल्याचे प्रतिपादन समादेशक नम्रता पाटील (भापोसे ) यांनी करून आगामी क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. नंदवाळ कवायत मैदान येथे सदरचे क्रीडा स्पर्धा सांगता समारोह पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक समादेशक हिंगरूपे व आभार प्रदर्शन सहायक समादेशक सदांशिव यांनी केले. कार्यक्रमास पीआय लीपरे, तांदळे, सहस्रबुद्धे psi गेंगजे, शेळके , गुप्ता, झीटे, सावंत, वारंग हे उपस्थित होते. क्रीडा स्पर्धांचे नियोजन psi महेश साळुंखे, पोलीस हवालदार शितल पवार, दीपक मलाई, गायकवाड व शिकलकर व सर्व खेळाडू अंमलदार यांनी केले. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सी कंपनी यांनी प्राप्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अशोक गुजर यांनी केले.
Comments
Post a Comment