बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.

 बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.

--------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम 

--------------------------------------

काल रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून ह्या घटनेचे कुठे वाच्यता केलीस तर बघ अशी धमकी त्या पिडीतिला दिली. ही घटना पिडीतिने तिच्या आईस  सांगितली. या घटनेची तक्रार करण्यासाठी पीडित व तिची आईने संजय नगर पोलीस ठाण्यात दुपारी पावणे बाराच्या सुमारास तक्रार दिली. त्या फिर्यादी वरून संशयितांच्या शोधण्यास संजय नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके रवाना करून आरोपीला तक्रार दिल्यापासून दीड तासात अटक केले. 

अटक केलेल्या आरोपी नाव संजय प्रकाश माने (वय 30) असे असून तो अत्याचार केलेल्या पीडीतीच्या शेजारीच आहे. सदर घटनेचा अधिक तपास संजय नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.