127 वेळा रक्तदान करणारी मिरज मधील रवींद्र फडके.
127 वेळा रक्तदान करणारी मिरज मधील रवींद्र फडके.
-----------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
-----------------------------------
कुपवाड: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 येथे संपन्न झालेल्या आरोग्य शिबिरात रक्तदान शिबिराचे उद्घाटन मिरज येथील रक्तदान चळवळीचे अग्रदूत, रोटरी क्लब मिरजेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र फडके यांच्या 127 वा रक्तदान संपन्न झाला.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. गुरव, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, रक्त कॅन्सर तज्ञ संदीप नेमानी, राजपूत स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक एम एम रजपूत, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे डॉ. रवींद्र ताटे उपस्थित होते.
कै.कु. प्रसाद हिरेमठ मेडिकल फाउंडेशन सांगली मिरज कुपवाड महापालिका, श्री गणेशोत्सव मंडळ व रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाल्या सर्व रोग निदान ,सल्ला, मार्गदर्शन व उपचार महाआरोग्य शिबिरात या रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा लाभ सुमारे 1000 गरजूंना झाला. आभार मुख्य संयोजक बसवराज हिरेमठ यांनी मांनले...
Comments
Post a Comment