आपल्या लोकांची सेवा करायला मिळणं हे माझं नशिबच :- आर एल निकम.

 आपल्या लोकांची सेवा करायला मिळणं हे माझं नशिबच :- आर एल निकम.

-----------------------------------

भणंग  प्रतिनिधी

शेखर जाधव

-----------------------------------

     मेढा येथे आपल्या जवळच्या लोकांची जनतेची सेवा करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो असे जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित विभागीय विकास अधिकारी आर एल निकम यांनी केले बँकेच्या व्यवसाय वृध्दी बरोबरच , खातेदार , ठेवीदार यांना उत्तमोत्तम सेवा पुरवणे ,व्यवसाय उदयोग तसेच अन्य कारणासाठी त्वरीत अर्थ पुरवठा करण्याचे काम सातारा जिल्हा बँक निश्चित करील. मी स्वतः मेढा शाखेत शाखाप्रमुख म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे तालुक्यातील जनता कशी आहे हे मला माहीत आहे जनता जेव्हढी प्रेमळ , साधी आहे तेव्हढी तापट सुद्दा आहे परंतु बँकेस कायम सहकार्य करणारी आहे जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले व जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत तालुक्यातील जास्तीत जास्त तरूणांना यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी बँक कायम पाठीशी असणार आहे ज्या खातेदारांच्या अडचणी असतील त्यां नक्कीच सोडविणेचे काम मी बँकेमार्फत करीन. बँकेचे ठेवीदार ,कर्जदार , खातेदार , जेष्ठ नागरीक खातेदार , हितचिंतक यांना उत्तम सेवा देणेत येईल अशी याप्रसंगी त्यांनी ग्वाही दिली 

 निकम साहेब आपण पांडुरंगाचे भक्त आहात तेव्हा भक्ती परमेश्वराची , सेवा मानवाची या उक्तीप्रमाणे आपण खातेदारांची , शेतकऱ्यांची सेवा करावी असे मत सचिव संघटनेचे माजी अध्यक्ष, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव जुनघरे यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रम प्रसंगी प्रतापगड साखर कारखान्याचे संचालक , प्रगतशील शेतकरी दिलीप आबा वांगडे , संचालक बाळकृष्ण निकम ,ओझरे सोसायटीचे माजी चेअरमन आनंदराव लकडे बापू ,बामणोली तर्फे कुडाळचे सुनील तरडे पोलीस उपनिरीक्षक मुंबई , माणिक तरडे ,पवन धनावडे उपसरपंच ,पोलीस पाटील राजेंद्र तरडे ,धर्मु तरडे , शिवाजी तरडे , राजेश तरडे ,दारासिंग ओतारी , दयानंद तरडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.