कुरुकलीतील पूरग्रस्त दलित समाजाच्या हिमालयासारखा पाठीशी.

 कुरुकलीतील पूरग्रस्त दलित समाजाच्या हिमालयासारखा पाठीशी.

------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार            

------------------------------

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा.

श्री. घोडेकर मंदिरात स्थलांतरित पूरग्रस्त कुटुंबांची साधला संवाद

*कुरुकली ता.  कागल येथील दलित समाजाच्या वसाहतीचा बहुतांशी भाग महापुराच्या काळात पावसात पाण्याखाली जातो. या पूरग्रस्त दलित समाजाच्या हिमालयासारखा पाठीशी ऊभा आहे, असा दिलासा महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. महापुरापासून संरक्षणासाठी त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.*

           

*आज शनिवार दि. २७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला मंत्री श्री. मुश्रीफ यांनी महापुरामुळे श्री. घोडेकर मंदिरात स्थलांतरित झालेल्या १५  कुटुंबीयांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.   मागासवर्गीय वसाहतीजवळ असणारा ओढा पिचिंग करून या ओढ्यावर साकव बांधकाम करू, असेही त्यांनी सांगितले.*   

        

*यावेळी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी बोंगे, मुरगुडचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे, ग्रामसेवक श्री. कुंभार या अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे पथकही उपस्थित होते.* 

       

*यावेळी बी. आर. पाटील, विकास पाटील, भास्कर पाटील, महेश पाटील, व्ही. डी. पाटील, राजाराम बेलवळेकर,  बाळासाहेब पाटील, तानाजी पाटील, गुलाब तिराळे, अमित कांबळे, दिनकर कुंभार, विवेक कांबळे, सुनील कांबळे, वसंत गणपती पाटील आदी प्रमुखांसह ग्रामस्थ उपस्थित होते.*

===========

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.