लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रावर कर्ज.

 लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रावर कर्ज.

------------------------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी

राजू कदम

------------------------------------------

अर्थ खात्याच्या आक्षेपावर आता अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं 

मुंबई:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीय सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून नवाब सुरू झाला आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. मात्र, या निर्णयावर अर्थ खात्याचे आक्षेप घेतलेला होता, ही बाब आता समोर आले आहे. राज्यभर या योजनेसाठी महिला अर्ज भरत असताना आता महायुतीमध्ये यावरून वाद सुरू झाला आहे. राज्यावर आधीच भरमसाठ कर्ज असताना या योजनेसाठी वर्षाला 46,000 कोटी रुपयाचे तरतूद करावी लागेल. त्यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा 8 लाख कोटी रुपयांच्या आसपास पोचल, याकडे लक्षवेधत ही योजना आर्थिक दृष्ट्या नसल्याचे अर्थ विभागाचे म्हणणे होते. या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

अजित पवार पवारांनी याबाबत आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट लिहिली आहे, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतः ची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्याच्या वर्ष 2024 - 25 चा अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांचा संपूर्ण रकमेची तरतूद या वर्षाच्या अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्र सारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे ...



Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.