सृजनशक्ती श्रमिक फौंडेशन, कोल्हापूर संचलित जिजाऊ बालविकास मंदिर आणि सृजन रत्न गुरुकुल अकॅडमी मजले. येथे आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम.

 सृजनशक्ती श्रमिक फौंडेशन, कोल्हापूर संचलित जिजाऊ बालविकास मंदिर आणि सृजन रत्न गुरुकुल अकॅडमी मजले. येथे आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम.


-------------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे 

------------------------------------

        आज आषाढी एकादशीचा कार्यक्रम प्रशालेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यामध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विठ्ठल व रखुमाई यांच्या वेशभूषे मध्ये इ.४थी  मधील चि. सोहेल नदाफ आणि इ. ३री मधील कु. आरोही वाडकर होते. इ. ४थी मधील चि. श्रीशैल्य जितेंद्र देसाई यांने त्याच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती प्रशालेस भेट दिली.


 कार्यक्रमाचे सुरुवात पालखी पूजनाने  करण्यात आली.नंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करून गावामधून भव्य दिंडी काढण्यात आली. गावांमधील महिलांनी पालखी पूजन केले. विठ्ठल विठ्ठल या नामस्मरणाने गावामधील वातावरण हे आनंदी आणि भक्तीमय  झाले होते.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. व श्री. पांडुरंग नाईक, मा. सौ. व श्री. शाखा गायकवाड आणि मा. सौ. व श्री. विनायक जाधव तसेच संस्थेचे संस्थापक मा. श्री. एस .डी .पाटील सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहा.शिक्षका सौ. अस्मिता पाटील टीचर यांनी केले सौ प्रीती पाटील टीचर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी वेशभूषा केली होती. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. पद्मश्री पाटील मॅडम यांनी सूत्रबद्ध नियोजन केले आणि सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदाने संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.