पुणे विभाग शिक्षण मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर सर शांतिनिकेतन सांगली येथे प्रिंटरच्या वाटपास उपस्थित
पुणे विभाग शिक्षण मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर सर शांतिनिकेतन सांगली येथे प्रिंटरच्या वाटपास उपस्थित.
------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
------------------------------------
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर सर यांच्या विशेष प्रयत्नाने विविध शाळांना होत असलेल्या मल्टीफ्रंक्शन प्रिंटरच्या वाटप समारंभास शांतीनिकेतन लोक विद्यापीठ, सांगली येथे उपस्थित राहिले.
आ. तासगावकर यांनी शिक्षक बांधवांच्या प्रगतीसाठी आज अखेर उत्तम प्रकारे काम केले आहे. शिक्षकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी वेळोवेळी मोलाची भूमिका बजावली आहे. कोणतीही शाळा शैक्षणिक साहित्य पासून वंचित राहू नये याकरिता ते कटाक्षाने लक्ष ठेवून असतात आणि तिथे तत्परतेने पाठपुरावा करतात ,हे निश्चित गौरवस्पत आहे. त्याचे हे कार्य असेच सुरू राहो हीच सदिच्छा. कार्यक्रमास समवेत आ. डॉ. विश्वजीत कदम,आ. विक्रम सिंह दादा सावंत, आ. सुमनताई पाटील, आ. अरुण अण्णा लाड, श्रीमती जयश्रीताई पाटील, मा. पृथ्वीराज बाबा पाटील व इतर मान्यवर तसेच बहुसंख्या शिक्षक बांधव व मुख्याध्यापक उपस्थित होते..
Comments
Post a Comment