राधानगरी आगाराच्या एस टी बसेस भोगावती. महाविद्यालया मार्गे सोडाव्यात.
राधानगरी आगाराच्या एस टी बसेस भोगावती. महाविद्यालया मार्गे सोडाव्यात.
----------------------------------
कौलव प्रतिनिधी
संदीप कलिकते
-----------------------------------
राधानगरी ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते राधानगरी अशा एस टी बसेसच्या फेऱ्या चालू असतात या मार्गावर मोठी मोठी गाव आहेत गाडी मध्ये विद्यार्थी, शासकीय कर्मचारी नोकरवर्ग, महिला, दिव्यांग व्यक्ती वयोवृद्ध लोक यांची दररोज कोल्हापुरात ये जा असते,
एस टी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते भोगावती महाविद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थी संख्या असंख्य आहे, त्यांना ताटकळत बसावे लागते राधानगरी -रंकाळा गाडी अनेक थांब्यावर न थांबता विद्यार्थी न घेता कोल्हापूरच्या दिशेने जात असते तीच परिस्थिती कोल्हापूरहून राधानगरीला येताना होते यादरम्यान गाडी हाउसफुल होते त्यामुळे विद्यार्थ्यांना बस मध्ये जागा मिळत नाही विद्यार्थ्यांना मग वडापचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे त्यांना ज्यादा भुरदंड सोसावा लागत आहे एसटी पास असुन उपयोग नाही पुन्हा वडापसाठी खर्च करावा लागत आहे पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या मार्गावरील एस टी बसेस काही प्रमाणात भोगावती महाविद्यालय मार्गे सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे एसटी प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून विद्यार्थ्यांची होणारी वणवण थांबवावी
Comments
Post a Comment