पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसईत लोकनायक जयप्रकाश नारायण कृष्ठ रोग हॉस्पिटल मध्ये आरोग्य साहित्य वाटप.

 पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसईत लोकनायक जयप्रकाश नारायण कृष्ठ रोग हॉस्पिटल मध्ये आरोग्य साहित्य वाटप.

------------------------------

मुंबई प्रतिनिधी

यशवंत खोपकर 

------------------------------

शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचा पुढाकार .

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या माध्यमातून  २७ जुलै उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसई येथे रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी. लोकनायक जयप्रकाश नारायण कृष्ठरोग निर्मूलन हॉस्पिटल येथे आरोग्यदायी वस्तूचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती विनायक (दादा) निकम विधानसभा संघटक, सौ.किरण ताई चेदंवणकर माजी नगरसेविका गटनेत्या वसई विरार महानगरपालिका,भगवान वजे वसई तालुका प्रमुख,विजय शर्मा,सुरेश मिश्रा वाहतूक सेना यांच्या उपस्थितीत पाण्याची फिल्टर मशीन,कपडे धुण्याची वॉशिंग मशीन,सिलिंग फॅन ३नग,डायनिंग टेबल, रबर मॅट ५० नग, कपडे धुण्याचे साबण, अंघोळीचे डेटॉल साबण, तेलाची बाटल्या , फिनेल बाटल्या,बिस्किट इत्यादी  आरोग्यदायी वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर,संदीप चादीवडे(सचिव), दौलत बेल्हेकर( संचालक), दिपक चौधरी(कार्यकारणी सदस्य),वसंत घडशी(कार्यालप्रमुख),बढु चौधरी,संजय चव्हाण,विनय चौधरी,मेघा सावंत,वनिता वायकर,निर्मला आवटे,स्वरा पवार, इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक, महिला आघाडी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.