अवनि हॉटेल महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवेल : शबाना आझमी.

 अवनि हॉटेल महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवेल : शबाना आझमी.

-----------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-----------------------------

अवनि संस्थेने गरजू महिलांच्यासाठी तसेच प्रौढ मुलींच्या स्वावलंबनासाठी  जैताळफाट्यावर सुरू केलेला हॉटेलचा शुभारंभ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी शबाना आझमी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, येणाऱ्या काळात अवनि हॉटेल समाजाला दिशा देईल. यामधून बाकीच्या महिला प्रेरणा घेतील आणि त्या देखील स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने पाऊल टाकतील. कोणत्याही महिलेने स्वतःला कमी न समजता काम केले पाहिजे. महिला कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे पडणार नाहीत. या हॉटेलच्या माध्यमातून खवय्यांना पौष्टिक आणि स्वादिष्ट आहार मिळेल याची मला खात्री आहे. त्यामुळे खाण्याची आवड असलेल्या प्रत्येक समाजशील  खवय्याने या हॉटेलला नक्की भेट द्यावी. यावेळी त्यांनी अवनि संस्थेच्या कामाचे कौतुक देखील केले.

प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी अवनिच्या कामांमध्ये मी इथून पुढे सहभागी असेल असा विश्वास व्यक्त केला. येणाऱ्या काळात अवनि सोबत प्लास्टिक मुक्त कोल्हापूर करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.  राजा कसा असला पाहिजे जो दुसऱ्याचे  दुःख समजून घेणारा असावा आणि ते आज राणीने दाखवून दिले असे उदगार अनुराधा भोसले साठी त्यांनी काढले.शबाना आझमी यांच्या हस्ते  हॉटेल चालवणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी प्रास्ताविक केले. अवनि संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, डॉ मंजुळा पिशवीकर, उज्वल नागेशकर जयसिंगराव कदम श्रेया घोडावत, स्वयंपूर्णच्या अध्यक्षा व शैला पाटील, अमरजा निंबाळकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाकरिता निहाल शिपुरकर यांनी 25 हजार रुपये ची देणगी देण्यात आली. सूत्रसंचलन मनीषा झेले, आभार जयश्री कांबळे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.