आरक्षण बचाव यात्रे संदर्भात वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिम च्या वतीने सभा संपन्न.
आरक्षण बचाव यात्रे संदर्भात वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिम च्या वतीने सभा संपन्न.
----------------------------------
रिसोड प्रतिनीधी
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी,एससी,एसटी आरक्षण बचाव यात्रा मुंबई येथून सुरू झाली आहे. दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी ही यात्रा वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे पदार्पण करणार आहे. या यात्रेच्या नियोजना संदर्भात दिनांक 27जुलै 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिम तर्फे नियोजन सभेची बैठक मालेगाव येथील विश्रामगृहात पार पडली . सभेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष किरणताई गिऱ्हे (भांदुर्गे) ह्या होत्या. तर प्रमुखपदी पश्चिम विदर्भअध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे हे होते. जिल्ह्यातील संपूर्ण ओबीसी, एससी आणि एसटी नीं सभेला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आव्हान यावेळी करण्यात आले.ओबीसी आरक्षण आबाधीत रहावे, ओबीसींचा आणि मराठ्यांचा वाटा हा वेगळा असावा, ओबीसी, एससी, एसटी यांचे पदोन्नतीतील आरक्षण तसेच शिष्यवृत्ती कायम रहावी असे अनेक मुद्दे घेऊन महाराष्ट्रभर जनजागृती करण्यासाठी ही यात्रा आयोजित केलीआहे.यावेळी महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे, महासचिव प्रतिभा अंभोरे,जिल्हाउपाध्यक्ष रंगनाथ धांडे,रिसोड मालेगाव संघटक पारितोषिक इंगोले,जिल्हा सचिव दिलीप भगत,मालेगाव तालुकाध्यक्ष सारनाथ अवचार, महासचिव राजू जमदाडे, रिसोड तालुका अध्यक्ष अखिलभाई, जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई राऊत,सम्यक विद्यार्थी आंदोलन चे जिल्हाध्यक्ष अभिषेक सपकाळ, शहराध्यक्ष अमोल पखाले , महासचिव संजय पडघान,रिसोड शहर महासचिव जियाउर सर,केशव उचित आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment