लाडकी बहिण योजनेच्या ऑनलाईन कामाबाबत आशा सेविकांचे आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन.
लाडकी बहिण योजनेच्या ऑनलाईन कामाबाबत आशा सेविकांचे आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन.
----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) संलग्न आशा स्वयं सेविका यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले सदर निवेदनामध्ये शासनाच्या लाडकी बहिण योजनेच्या कामाचे अर्ज ऑनलाईन भरण्याच्या सुचणा आम्हाला प्राप्त झाल्या आहेत मात्र जिल्ह्यातील बहुतांश आशा कडे ऑनडराईड मोबाईल उपलब्ध नाहीत, ग्रामीण भागात पुरेसे मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाईन कामात व्यत्यय येतो, ऑनलाईन कामा बाबत आशांना पुरेसे व परिपूर्ण ज्ञान उपलब्ध नसल्याने त्या मध्ये चुका होऊन जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे विशेषता आशांवर या कामाची जबाबदारी दिल्यास शासनाने आशांना नेमुन दिलेल्या नियमीत कामाकडे आशांचे दुर्लक्ष होणार असल्याने आशांना वरिष्ठ अधिकाऱ्या सह जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लाडकी बहिण योजनेच्या कामाची जबाबदारी आशांना देण्यात येऊ नये करीता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून या कामासंदर्भात लक्ष वेधले सदर लाडकी योजने संदर्भात अँड्रॉइड मोबाईल व नेट सुविधा दिल्याशिवाय कामे शक्य नसल्याचे अशा गटप्रवर्तक यांनी प्रसिद्धीस पत्रकात म्हटले आहे ,
Comments
Post a Comment