सांगली : कामगार मंत्रातून चालणाऱ्या योजनेचा फक्त भारतीय जनता पार्टीच्या समर्थक कामगारांनाच मिळणार का सतीश साखळकर.
सांगली : कामगार मंत्रातून चालणाऱ्या योजनेचा फक्त भारतीय जनता पार्टीच्या समर्थक कामगारांनाच मिळणार का सतीश साखळकर.
------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
------------------------------
सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कुपवाड एमआयडीसी मध्ये कामगार नोंदणी मधील कामगारांना साहित्य वाटपाची कुपन भारतीय जनता पार्टी समर्थक उद्योजक व भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी यांच्यामार्फत चालू आहे याचा अर्थ कामगार मंत्रालयातून चालणाऱ्या योजना फक्त भारतीय जनता पार्टीच्या समर्थक कामगारांनाच मिळणार का? अन्य कामगारांना पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हायला पाहिजे का असा प्रश्न खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना पडत आहे.
लोकसभेमध्ये एवढी बदनामी होऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे कामगार मंत्रालय असताना सुद्धा असे प्रकार घडत असतील तर हे निषेधार्य आहे या माध्यमातून राज्यपालांना आम्ही उद्या पत्र पाठवून यांच्या चौकशीची मागणी करत आहोत व या गोष्टीचा निषेध आहे.
उद्यापासून सदर गोष्टी कोणाच्या कारखान्यातून अथवा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार असतील तर मोठ्या प्रमाणात आंदोलन सोडून कामगार मंत्री पालकमंत्री स्थानिक आमदार व तथाकथित भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांच्या मार्फत जे उद्योग चालू आहे त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल..
Comments
Post a Comment