सांगली : विशाल पाटील गॅंग दोन वर्षासाठी चार जिल्ह्यातून तडीपार.
सांगली : विशाल पाटील गॅंग दोन वर्षासाठी चार जिल्ह्यातून तडीपार.
------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
------------------------------------
विटयामधील विशाल पाटील टोळीला सांगली, सातारा, कोल्हापूर, आणि सोलापूर ,या चार जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तरीपण करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिले आहे.
पोलीस निरीक्षक मेमाणे म्हणाले, विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार विशाल पाटील टोळीला सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधी करिता हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे गुन्हेगार डोळ्याचे दहशत मोडून त्यांचे समूळ त्यांचे उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर ही तडीपराचे कारवाई करण्यात आले आहे.
टोळीप्रमुख व त्यातील विशाल प्रशांत पाटील ( वय 24,रा. शाहूनगर) अमरजीत अनिल शिरसागर ( वय 22 रा. पाटील वस्ती) अमृत राजेंद्र काळोखे (वय 24 रा) विवेकानंद नगर शुभम महेश कोळी (वय 25 रा. कदमवाडी) किसन राजेंद्र काळोखे (वय 30) विजय राजेंद्र काळोखे ( व 24) सागर देवेंद्र गायकवाड (वय 27 रा तेही विवेकानंद नगर) या टोळी विरुद्ध सन 2019 ते 2023 मध्ये खून, कुणाचा प्रयत्न करणे, बिगर परवाना अग्निशस्त्र जवळ बाळगून दहशत माजवणे, अपहरण करणे, बांधकाम साहित्याची तसेच मोटरसायकल आणि इतर चोऱ्या करणे असे गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे या टोळी विरुद्ध प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे, यांनी पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार येथील विभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे यांचेकडे चौकशी केली. त्यानुसार या सर्वांना तडीपार करण्यात आले आहे . दरम्या,न टोळीने गुन्हे करणाऱ्या लोकांवर बर काही नाही नजर ठेवूनबारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करू असेही पोलीस निरीक्षक मेमाणे यांनी सांगितले आहे..
Comments
Post a Comment