चांदोली धरण व परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का : तीव्रता ३ रिस्टर स्केल, नागरिक भयभीत.

 चांदोली धरण व परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का : तीव्रता ३ रिस्टर स्केल, नागरिक भयभीत.

--------------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी

विनोद शिंगे

--------------------------------------

वसंत सागर या चांदोली धरण व वारणावती ता. शिराळा परिसरात बुधवार दि.२४ रोजी पहाटे ४. ४७ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जानवला या भूकंपाची तीव्रता ३ रिस्टर स्केल एवढी होती वारणावती पासून धरण क्षेत्रासह केंद्र बिंदू पासून ८ कि.मी. परिसरात हा भूकंप जानवल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

वारणावती भूकंप केंद्रावर झालेल्या नोंदी नुसार ४२ सेंकद पर्यन्त भूकंप झाला असून कोणतेही नुकसान झालेले नाही नागरिकांनी भयभीत न होता सावधानता बाळगावी असे वारणा पाटबंधारे कोडोली उप विभागाचे सहा. अभियंता मिलींद किटवाडकर यानी सांगीतले.

चांदोली धरण क्षेत्रात पाऊसाचा जोर वाढला आहे आजवर धरण क्षेत्रात १९५३ मि. मी. पाऊस पडला असून धरणात २९.६१ टीएमसी पाणीसाठा होऊन धरण 

८६.०५ टक्के भरले असून विद्युत निर्मीती साठी १६५८ तर वक्रद्वार मधून ७२१६ असा ८८७४ क्यूसेस विसर्ग वारणा नदी पात्रात सुरु असल्याचे सहा. अभियंत श्री. किटवाडकर यानी सांगीतले.

    गतवर्षी बुधवार दि.१६ ऑगष्ट २०२३ रोजी सकाळी ६.३५ वाजता ३.२ रिस्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला होता वारणावती पासून केंद्रबिंदू पर्यन्त १५ कि.मी. अंतरापर्यंन्त हा भूकंप जानवला होता.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.