शाळा सुरू झाल्यातरी विद्यार्थ्यांना अजूनही आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेले नाहीत.
शाळा सुरू झाल्यातरी विद्यार्थ्यांना अजूनही आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेले नाहीत.
------------------------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------------------
शाळा सुरू होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी विद्यार्थ्यांना अजूनही आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेले नाही. कारण, आरटीईचा मुद्दा हायकोर्टात प्रलंबित होता.
सरकारनं शिक्षण हक्क कायद्यामध्ये 9 फेब्रुवारी 2024 रोजी एक अधिसूचना काढून सुधारणा केली होती. त्यानुसार 1 किलोमीटरच्या परिसरात असणाऱ्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार होता. यामधून खासगी शाळांना वगळण्यात आलं होतं.मग गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांचे दरवाजे बंद होतील या भीतीनं सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.
याआधी हायकोर्टानं सरकारच्या या नव्या सुधारणेला स्थगिती दिली होती. त्यावेळी काही खासगी शाळांनी सुद्धा हायकोर्टात धाव घेत हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. आता या सगळ्या प्रकरणावर मुंबई हायकोर्टानं निकाल दिला आहे.
Comments
Post a Comment