शाहुवाडी महावितरण उप भियंता कुंभारी साहेब यांना देण्यात आले निवेदन.
शाहुवाडी महावितरण उप भियंता कुंभारी साहेब यांना देण्यात आले निवेदन.
---------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनीधी
आनंदा तेलवणकर
---------------------------------
शाहुवाडी : महाराष्ट् नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. युवराज (बाबा) काटकर, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष श्री. संजय पाटील, तालुका अध्यक्ष श्री. बाळासाहेब कदम, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोपर्डे मध्ये जी दुर्घटना घडली त्यासंबंधी महावितरण ला जाब विचारण्यात आला व त्या कुटुंबास दहा ते पंधरा लाख रुपये ची मदत महावितरण ने द्यावी अशी मागणी करण्यात आली व इथून पुढे अशा प्रकारे कोणत्याही दुर्घटना होऊ नयेत त्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले. यावेळी श्री. कुंभारी साहेब उपाभियंता महावितरण शाहूवाडी यांनी निवेदन स्वीकारून योग्य त्या खबरदारी घेण्याचे काम चालू केलेले आहे,असे सांगण्यात आले. यावेळी मनसे तालुका सचिव श्री. प्रवीण कांबळे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष श्री. संगम शिराळकर, श्री. शिवाजी फिरके विभाग अध्यक्ष, श्री. सिद्धार्थ लोखंडे उपाध्यक्ष विद्यार्थी सेना, श्री. निलेश हर्डीकर विशालगड शाखाध्यक्ष, सौ.अंजली हर्डीकर उपाध्यक्ष महिला, श्री. शिवाजी घोलप शाखाध्यक्ष प.निनाई, श्री मिराज नायकवडी, श्री. मंगेश घोडके, श्री. अभिजीत पाटील, श्री. सचिन कांबळे इत्यादी मनसे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment