आप्पासाहेब गिरणारे कॉलेज ऑफ फार्मसी येथे कायदेविषयक शिबिर संपन्न झाला.
आप्पासाहेब गिरणारे कॉलेज ऑफ फार्मसी येथे कायदेविषयक शिबिर संपन्न झाला.
--------------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------------------
सांगली आंतरराष्ट्रीय जागतिक न्याय दिनाविषयी जिल्हा विधि सेवा प्राधिकारण, सांगली यांच्यावतीने आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, नेमिनाथ नगर सांगली, येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि .ग. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कायद्याविषयक शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि .ग. कांबळे यांनी मोटार वाहन कायद्याबद्दल माहिती देऊन अपघातापासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करावे असे सांगितले. जय विद्यार्थीनी वाहन परवाना काढला नाही त्यांनी तात्काळ आजच तो काढण्याची सुरुवात करावी. कायद्याची सुरुवात ही स्वतः आपल्यापासून केली पाहिजे. कायदा हा घरातूनच पहिल्यांदा अमलात आणला पाहिजे, औ त्यामुळे आपली व समाजाची तसेच राष्ट्राची प्रगती होईल व राष्ट्र सुजलाम सुफलाम होईल असे प्रतिपादन करून जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाच्या कामाबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अँड अमोल डोंबे यांनी उपस्थित यांना आंतरराष्ट्रीय जागतिक न्याय दिना विषयी मार्गदर्शन केले. कायदा हा सर्वत्र आहे. कायद्याची माहिती असणे हे प्रत्येकाची कर्तव्य असल्याचे सांगून 1 जुलै 2024 पासून नव्याने लागू झालेल्या कायद्याची माहिती दिली. प्रत्येकाने कायदा हा पाळलाच पाहिजे त्यामुळे आपली, समाजाची व राष्ट्राची प्रगती निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक विजय कोगनोळे यांनी केले. सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रियंका मजलेकर यांनी केले. आभाळ कोमल पवार यांनी मानले. या शिबिराचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस .ए. तांबोळी प्राध्यापक, वर्ग व कर्मचारी यांनी केले. या शिबिरास महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते...
Comments
Post a Comment