नऊ हजाराची लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.

 नऊ हजाराची लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.

---------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------

कोल्हापूर : कबनूर ग्रामपंचायतमधील ग्रामविकास अधिकारी गणपत धनाजी आदलिंग रा. कसबा बावडा यांच्यावर नऊ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. जिल्हा परिषद मुख्यालयच्या इमारतीत सोमवारी, २२ जुलै रोजी हा प्रकार घडला. मुख्य इमारतीमध्येच ही कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली. 

अधिक मिळालेली माहिती अशी की 

या प्रकरणातील तक्रारदार हा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांनी कबनूर गावातील वॉर्ड नंबर: २ मधील वाढीव पाइप लाइन बसविण्याच्या कामाची निविदा भरली आहे.निविदेप्रमाणे कामाची  विचारणा करण्यासाठी तक्रारदार काँन्ट्रॅक्टरनी  आदलिंग यांची भेट घेतली. तेव्हा आदलिंग यांनी कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरकडे नऊ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा लावला. तक्रारदारांकडून नऊ हजाराची लाच घेताना आदलिंग यांना रंगेहाथ पकडले. 

शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक बापू साळुंखे , पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार ला.प्र.वी. कोल्हापूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.