गडमुडशिंगी ते वसगडे रोडवर घसरली गाडी.
गडमुडशिंगी ते वसगडे रोडवर घसरली गाडी.
------------------------------------
हुपरी प्रतिनिधी
जितेंद्र जाधव
------------------------------------
गडमुडशिंगी गावांमधून फोर व्हीलर झेन MH 12 E M 6946 गाडी वसगडे या गावाकडे जात होती काही अंतर गेल्यावर ह्या रोडवर गावातील मोकाट कुत्र्यांचा कळप वावरत असलेला चालकाला दिसला काही कुत्री रस्त्यावर भांडत होती चालकाने समोरचे दृश्य पाहून गाडीला ब्रेक मारत काही कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी साईडला घेण्याचा प्रयत्न केला परंतु पाऊस असल्यामुळे आणि चिखलामुळे गाडी साईटच्या रस्त्याकडे असलेल्या चरीमध्ये जाऊन पडली गाडी एका साईडला पलटी झाली गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तींना सुदैवाने काहीही दुखापत झालेली नाही त्यांना गाडी मधून सुखरूप बाहेर काढण्यात आले गाडीचे थोडेफार नुकसान झाले गावातील लोकांच्या मधून उलट सुलट चर्चा सुरू होती की ग्रामपंचायतींन या मोकाट कुत्र्यांच्या वर काय तरी नियोजन करावे ह्या रस्त्यावर मोकाट कुत्र्याचा दररोजचा सुळसुळाट असतो काही दिवसापूर्वी दोन टू व्हीलर वाले कुत्री आडवी आल्यामुळे पडले होते त्यांना थोडीफार दुखापत झाली होती गावातील सर्व सांडपाणी घाण कचरा या रस्त्याकडेल्या असलेल्या गटर मधून ओढायला मिसळला जातो ती घाण खाण्यासाठी या रस्त्यावर अशा मोकाट कुत्र्यांचा वावर दिसत आहे.
तरी ग्रामपंचायतिने अशा रोजच्या घडणाऱ्या अपघाताची दखल घेऊन या मोकाट कुत्र्यांचा कायमचा तर बंदोबस्त करावा अशी प्रतिक्रिया लोकांच्या मधून होत आहे
Comments
Post a Comment