हातकणंगले नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी अर्चना जानवेकर बिनविरोध.
हातकणंगले नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी अर्चना जानवेकर बिनविरोध.
------------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
हातकलंगले येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना अरुण जानवेकर यांची आज महाविकास आघाडीतून बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती, त्यासाठी अनेक पक्षीय उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले होते. परंतु आज सर्वांच्या सामोपचाराने व सहकार्याने सदर निवडणूक बिनविरोध करून महाविकास आघाडीच्या अर्चना जाणवेकर यांची हातकणंगले नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली, त्यांचा सत्कार आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
Comments
Post a Comment