आरक्षण बचाव यात्रा कोल्हापूर येथून सुरू.
आरक्षण बचाव यात्रा कोल्हापूर येथून सुरू.
----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
अमित खांडेकर
-----------------------------------------
मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते श्रीमंत छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार वाहून आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात झाली व शाहू स्मारक भवन येथे कोळी समाज बांधव नाभिक समाज बांधव अशा अनेक ओबीसीच्या संघटनांनी आरक्षण बचाव यात्रेचे कौतुक करत पत्रकार परिषद घेऊन आरक्षण बचाव यात्रेच्या रथाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन वेळी मा प्रकाश आंबेडकर साहेब प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे ओबीसी नेते अविनाश भोसेकर शिर्डीचे उत्कर्षा रूपवते कोल्हापूर जिल्हा प्रभारी क्रांतीताई सावंत प्रवक्ते आफरोज पठाण दक्षिण जिल्हाध्यक्ष दयानंद ठाणेकर जिल्हा सचिव रावसाहेब निर्मळे तेथून पुढे शिरोली मार्गे हेरले येथे मुस्लिम बांधवांनी सत्कार केला तेथून पुढे वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर यांच्या वतीने स्नेहभोजनाचे नियोजन करण्यात आले होते स्नेहभोजन करून हातकणंगले येथे तहसील ऑफिस पटांगणामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेतून ओबीसी बांधवांना संबोधित केले तेथून पुढे जयसिंगपूर येथे शाहू महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरक्षण बचाव यात्रेतून जयसिंगपूर येथे आरक्षण बचाव मोहिमेचे व सध्याच्या राजकीय हेतू व ओबीसी बांधवांना निवडून देणे या संदर्भात भाषण झाले पुढे रथ सांगली ला रवाना झाला
Comments
Post a Comment