मुरगूडचा ऐतिहासिक सर पिराजी तलाव पूर्ण क्षमतेने भरला.
मुरगूडचा ऐतिहासिक सर पिराजी तलाव पूर्ण क्षमतेने भरला.
----------------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
----------------------------------------
.मुरगूडचा ऐतिहासिक सर पिराजी तलाव आज मंगळवार सकाळी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्यामुळे मुरगूड, शिंदेवाडी, यमगे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे .
शिवभक्त समाजसेवकांनी तलावाच्या परिसरातील ओढे आणि तलावाची स्वच्छता मिळून केली होती मुरगूड करांना तसेच शिंदेवाडी आणि यमगेकरांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी तलाव परिसर स्वच्छ करून 500 दारूच्या बातम्या तब्बल एक टन कचरा गोळा करण्यात आला होता यंदाचा पावसाळ्यामध्ये ओढ्या मधून कचरा विरहित पाण्याचा ओढ्यामधून तलावाला पुरवठा झाला यानंतर मंगळवारी तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी बाहेर आले तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हिंदूवादी संघटना आणि शिवभक्त समाजसेवक यांच्या वतीने सरपिराजीराव तलावातील पाण्याचे पूजन आणि महाआरती करण्यात आली आता वर्षभर मुरगूडकरांसह यमगे आणि शिंदेवाडीकरांच्या पाण्याची चिंता मिटल्याची भावना यावेळी नागरिकांच्या भावना दिसून आल्या यावेळी या पूजेचे पौरोहित्य अनुबोध गाडगीळ यांनी केले यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, प्रकाश परिषवाड, संकेत शहा, जगदीश गुरव , सुभाष अनावकर,गणेश भाट यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment