कोल्हापूर पंचगंगा नदीचा रुद्र अवतार शिरोली पुला जवळील परिसरात पाणीच पाणी.
कोल्हापूर पंचगंगा नदीचा रुद्र अवतार शिरोली पुला जवळील परिसरात पाणीच पाणी.
------------------------------
हुपरी प्रतिनिधी
जितेंद्र जाधव
------------------------------
गेली आठ दहा दिवस सततधार पावसामुळे पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक भागात अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे या महापुराचा फटका अनेक भागातील अनेक गावातील नागरिकांना बसलेला आहे.
अशातलाच एक भाग म्हणून तावडे हॉटेल पंचगंगा फुला शेजारी असणारे पीर बाले साहेब दर्ग्यामध्ये पाणी शिरले आहे तेथील राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आले आहे काहीजणांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झालेले आहे आजूबाजूला असणाऱ्या भागातील सर्व शेती पाण्याखाली गेलेले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचे सुद्धा नुकसान झालेले आहे अनेकांचे ऊस पिकाचे भाताचे सोयाबीनचे भुईमुगाचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे पुढे तसेच पटेल मल्टीपर्पज हॉल बुधले मंगल कार्यालय आजूबाजूला असणारे फर्निचर चे दुकान ट्रॅक्टर शोरूम हेही पाण्याखाली गेले आहे बरेच दुकानांचे नुकसान झालेले आहेत पावसाचा जोर कमी असला तरी पाण्याचा विसर्ग काय कमी नाही अनेकांचे जनजीवन विस्कळीत झालेला आहे या पुराचा फटका वाडी वस्त्या ग्रामीण भागातील नागरिकांना झालेला आहे अनेक ठिकाणची वाहतूक बंद झालेले आहे अनेक गावांमध्ये एसटीच्या फेऱ्या बंद झालेले आहेत अनेक वाड्या वस्त्यांमध्ये गावांमध्ये विद्युत पुरवठा सुद्धा बंद आहे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून ज्या नागरिकांचे शेतीचे घराचे जे काही नुकसान झाले आहे त्यांना भरपाई देण्यात यावी अशी नागरिकांची चर्चा सुरू होती
Comments
Post a Comment