त्या अपघातातील पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्यावर मसलापेन येथे पोलीस इतमामात अंतिम संस्कार.

 त्या अपघातातील पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्यावर मसलापेन येथे पोलीस इतमामात अंतिम संस्कार.

-----------------------------

रिसोड प्रतिनिधी 

 रणजितसिह ठाकुर.

-----------------------------

 रिसोड तालुक्यातील ग्राम केशवनगर येथील रहिवाशी राजेंद्र मदन मोरे हे गेल्या चार वर्षांपूर्वी एमपीएससी मार्फत गृह खात्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यांची निवड झाली होती,यावेळी कर्तव्यावर असताना राष्ट्रीय राज्य महामार्गावर दिनांक 27 जुलै रोजी दुपारी घडलेल्या अपघातात बोरगाव मंजू येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा अपघाती मृत्यू झाला , बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कर्तव्यावर असताना मूर्तिजापूर येथून आपल्या टू व्हीलर गाडी क्रमांक एम एच 37 ए बी 4975 जात असताना त्यांचा कुरणखेड येथे अपघात झाला अकोल्याच्या दिशेने जात असणारी कार एम एस 30 पी 2788 क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला, असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरातच नव्हे तर अकोला वाशिम जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे यावेळी घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले ,यावेळी वीर भगतसिंग आपत्कांनी शोध व बचाव पथकाने घटनास्थळी मदत कार्य केले आणि दिनांक 28 जुलैला राहते गावी केशवनगर येथे पार्थिव आणल्यानंतर पोलीस इतमामात सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी त्यांच्या मागे आई-वडील ,तीन भाऊ ,पत्नी दोन जुळी मुले असल्यामुळे या परिवाराची फार मोठी हानी झाल्याचे नागरिक बोलत होते त्यावेळी परिसर परिसरातही त्यांच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला व नागरिक हळहळ व्यक्त करत होते,

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.