बिबखेडा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर.
बिबखेडा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर.
--------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
--------------------------------------
.आज दिनांक रोजी 11/07/2024 रोजी मौजा बिबखेड येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय रिसोड मंडळ कृषी अधिकारी रिसोड -2 यांच्या मार्गदर्शन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतावर राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन + तुर पिकाची शेती शाळा घेण्यात आली शेतकऱ्यांना शेती शाळांमध्ये सोयाबीन पिकावर येणाऱ्या कीड रोग सोयाबीन मध्ये निरीक्षण घेऊन कीड रोगाविषयी मार्गदर्शन करून पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत व तसेच दशपर्णी अर्क तयार करणे शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली कृषी सहायक श्री एल आर मेहेत्रे यांनी कीड व रोग विषयी मार्गदर्शन केले व तसेच कृषी सहाय्यक नितीन मोरे यांनी पाच टक्के निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क तयार करणे कृषी विभागाच्या इतर योजना विषयी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना संत्रा,मोसंबी,सिताफळ व इतर फळझाडे, व तसेच बांबू लागवड विषयी व तसेच पिक विमा भरणे याविषयी जनजागृती करण्यात आली रिसोड तालुका प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमास गावातील श्री विठ्ठल राव नरवाडे उपसरपंच मच्छिंद्र ढोणे पाटील , खुशालराव लांडे ग्रामपंचायत सदस्य इतर गावातील नागरिक हजर होते
Comments
Post a Comment