बानगे, आनूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून महापूर परिस्थितीची पाहणी.
बानगे, आनूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून महापूर परिस्थितीची पाहणी.
----------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
----------------------------------
पडझड झालेल्या घरांसह पाणी शिरलेल्या घरांचे व शेतीचे पंचनामे तातडीने करा.
प्रशासनाला दिल्या सूचना.
वेदगंगा नदीला महापूर आल्यामुळे कागल तालुक्यातील बानगे व आनूर येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी बानगे व आनुर गावांना भेट देऊन महापूर परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी विद्यामंदिर -बानगे शाळेत असलेल्या निवारा केंद्राला भेट देऊन महापूरग्रस्तांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या. आनूरमध्ये कुंभार गल्ली येथील पूर परिस्थितीची पाहणी व महापूरग्रस्तांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या.*
*मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की, महापुरामुळे पाणी शिरलेल्या घरांचे आणि पडझड झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करा. तसेच; नुकसान झालेल्या शेतीचेही पंचनामे तातडीने करा. तसेच नुकसान भरपाई तातडीने द्या.*
*बानगेमध्ये पुराचा सर्वे करून स्थलांतरित नागरिकांना गायरानमधील प्लॉटचे वाटप करा अशा सूचना त्यांनी दिल्या. वीज पुरवठ्यासाठी लागणारे पोल व वायर यासाठी लागेल तो निधी तातडीने देण्यात येईल, असे सांगितले.*
*आनूरमध्ये महापुराचा सर्वे करून रेड लाईन लावून त्यांना गायरान मधील काही प्लॉट्स पूर बाधित स्थलांतरित कुटुंबांना द्या, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.*
*बानगेमध्ये सरपंच सुनील बोंगार्डे, उपसरपंच चंद्रकांत शिंदे, माजी उपसरपंच युवराज पाटील, धनाजी पाटील, राजू पाटील, विलास पाटील, संतराम पाटील, मेहबूब मुजावर, मुस्तफा मुजावर, निवृत्ती पाटील, संजय कदम, प्रकाश कदम, शेखर सावंत, भगवान पाटील, आनंदा चौगुले, राहुल पाटील आदी प्रमुखांसह तलाठी सुप्रिया भगे, ग्रामसेवक नेताजी जिनकर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनूरमध्ये सरपंच काकासाहेब सावडकर, प्रकाश कुंभार, विनायक खोत, पांडुरंग खेडे, दत्तात्रय आरडे, डॉ. एन. आर. पाटील, सुभाष चौगुले, राजकिरण सावडकर, पोलीस पाटील स्वाती कांबळे, तलाठी प्रकाश महाडेश्वर, ग्रामसेवक अर्चना गुळवे, कृषी सहाय्यक ओमकार जाधव, व अधिकारी, ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*यावेळी प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कागल पंचायत समितीचे बीडीओ कुलदीप बोंगे, कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगारदिवे व अधिकारी उपस्थित होते.*
..................
*बानगे व आनुर येथे भेट देऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापूर परिस्थितीची पाहणी केली.*
============
Comments
Post a Comment