पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे पैकी चार दरवाजे खुले.

 पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे पैकी चार दरवाजे खुले.

---------------------------------- 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे 

---------------------------------- 

राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचा चार स्वयंचलित दरवाजा  गुरुवारी अकरा वाजून पन्नास मिनिटा पर्यंत उघडले होते तर सायंकाळी साडेचार वाजता एक स्वयंचलित दरवाजा असे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले तर शुक्रवारी पहाटे पाच वाजता एक स्वयंचलित दरवाजा उघडला होता व आज दुपारी एक वाजता एक स्वयंचलित दरवाजा पावसाचा जोर कमी झाल्याने बंद झाला तर सायंकाळी 5:45 वाजता एक स्वयंचलित दरवाजा बंद झाला आहे तसेच चार  स्वयंचलित दरवाजे सध्या चालू असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर यांनी दिली  


अधिक माहिती अशी की राधानगरी धरण परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असल्यामुळे राधानगरी धरण गुरुवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरले असल्याने राधानगरी धरणाचा  सकाळी दहा वाजून पाच  मिनिटांनी ते अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पर्यंत चार स्वयंचलित दरवाजे उघडले तर सायंकाळी साडेचार वाजता एक स्वयंचलित दरवाजा असे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले होते व शुक्रवारी पहाटे पाच वाजता एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून असे सहा स्वयंचलित दरवाजे उघडले  होते धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने शुक्रवारी दुपारी एक वाजून चार मिनिटांनी एक तर सायंकाळी 5:45 मिनिटांनी एक  स्वयंचलित दरवाजा असे दोन दरवाजे बंद झाले आहेत  त्यामुळे धरणाची पाण्याची पातळी ३४७. 16 फूट तर पाणीसाठा 8296.34 दशलक्ष घनफूट व धरण 100 टक्के भरले असून चार स्वयंचलित दरवाज्यातून प्रति सेकंद 5712 क्यूशेक पाण्याचे विसर्ग होत आहे तर , बी ओ टी विद्युत ग्रहा मधून पंधराशे क्यूशेक असा एकूण 7212 क्यूशेक पाणी नदीपात्रामध्ये विसर्ग होत असल्याने नदीपात्रामध्ये पाणी प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने नदीकडच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर व राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.