सातारा बोगदा ते परळीकडे जाणारा रस्ता मानेवाडी ते बोगदा दरम्यान चिखलमय झाला असून नुकत्याच नवीन झालेल्या रस्त्याची दुरावस्थाही दुचाकी चालकांच्या अपघाताचे कारण ठरत आहे.
सातारा बोगदा ते परळीकडे जाणारा रस्ता मानेवाडी ते बोगदा दरम्यान चिखलमय झाला असून नुकत्याच नवीन झालेल्या रस्त्याची दुरावस्थाही दुचाकी चालकांच्या अपघाताचे कारण ठरत आहे.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर.
-------------------------------
बोगद्याच्या पलीकडे सातारा ते मानेवाडी मार्गावर मुसळधार झालेल्या पावसाने तीन महिन्यापूर्वी डांबरीकरण झालेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरिल डांबर वाहून गेल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर चिखल झाल्याने वाहने घसरून पडण्याचे प्रकार सुरु असल्याने या रस्त्यावरील प्रवास धोकादायक बनला आहे. सातारा-सज्जनगड व परळी खोऱ्यातील अनेक गावांकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. नुकताचं लाखो रुपये खर्च करुन या रस्त्याच्या मजबुतीकरण व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते.
सातारा तालुक्यात पावसाने जोर धरल्याने पहिल्या पावसातच या रस्त्याचे डांबर वाहून गेले आहे. तसेच रस्त्याच्या कडेचा पॅचिंगचा भर वाहून गेल्याने भले मोठे खड्डे पडून हा रस्ता धोकादायक बनला आहे. काही दीवसापुर्वी रस्त्यावर चिखलाचा थर साचल्याने वाहने घसरून अनेक वाहणचालक गंभीर जखमी झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने डागडुजी करणे गरजेचे आहे. या रस्त्यावर सातत्याने वाहतूक सुरू असते. ठोसेघरच्या नयनरम्य धबधब्याकडे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. तसेच सज्जनगड हे देखील भाविकांचे ठिकाण ह्याच मार्गावर आहे. संबधित खात्याने व हलगर्जीपणे काम केलेल्या ठेकेदाराने या रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी अशी मागणी पर्यटक देखिल करु लागले आहेत.
"कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे रस्ता धुण्याची वेळ; शेकडो दुचाकी स्वार घसरून किरकोळ जखमी पुष्कळदा झाले आहेत.
सूत्रांनी संपर्क साधल्यावर
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचे म्हणणे असे येत आहे की.....नुकतेच झालेले बोगदा ते मानेवाडी रस्त्याचे काम हे पाऊस सुरू होताच डांबर वाहून जाऊ लागले आहे. व रस्त्याची बारीक खडी बाहेर येत आहे आम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क केला असून, पुन्हा रस्ता करण्याच्या सूचना केल्या आहेत,
पाऊस उघडल्यानंतर ठेकेदाराकडून शासनाची नुकसान भरपाई म्हणून पुन्हा रस्ता दुरुस्ती केली जाईल.
Comments
Post a Comment