विवाहप्रसंगी वधु-वरांना आम्र वृक्षांची भेट.
विवाहप्रसंगी वधु-वरांना आम्र वृक्षांची भेट.
----------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
----------------------------------------
काळ हा परिवर्तनशील आहे पुढेही परिवर्तनशील राहणारं हे त्रिकालबाधित सत्य आहे.बदलत्या काळानुसार चालत आलेल्या रूढी-परंपरेमध्ये सुध्दा बदल होत असतात पण त्यापैकी जनहितार्थ बदल स्विकारणे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे असे मत "छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त" गजानन मुलंगे ह्यांनी दि.13 जुलै रोजी शनिवारला छ. संभाजीनगर स्थित हॉटेल अतिथी येथे वधु सौ.अदिती देशपांडे व वर चि. अजिंक्य विडोळकर ह्यांच्या विवाह प्रसंगी आम्र वृक्षाची भेट देतांना व्यक्त केले.सद्धस्थितीत उद्योगधंदे तसेच शेती व्यवसायाला आधुनिक यंत्रसामूग्रीची जोड मिळाल्यामुळे सर्वांकडे पुरेसा पैसा आहे त्यामुळे साहजिकचं आजरोजी जीवनोपयोगी अत्यावश्यक वस्तु श्रीमंतापासून तर तळा-गाळातील लोकांकडे विद्यमान आहेत,यात तिळमात्र शंका नाही.एक काळ असा होता कि,ज्यावेळेस संसार उपयोगी भौतिक वस्तुंची जवळपास 90 टक्के लोकांकडे चणचणं होती पण आता काळ पूर्णतया बदलला आहे.लग्न प्रसंगी कपड्यांच्या बोजड आहेराला फाटा देत आज रोजी समाजाला सुदृढ आरोग्य,निरोगी हवामान,तसेच दर्जेदार अन्न-धान्य व चटकदार फळ-फळावळांची नितांत आवश्यकता आहे,ह्याची पुर्तता केवळ वृक्षारोपना द्वारे होऊ शकते हे तेवढेच खरे.आम्र वृक्षांची भेट स्विकारत वधु-वरांनी त्यांची लागवड करून संवर्धन करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.आम्र वृक्षां सोबतचं शुभ- आशिष देण्याकरिता वधु मातापिता सौ.दिपाली अविनाश देशपांडे,वर मातापिता सौ.माया प्रमोद विडोळकर,"आमची शाळा 1981"गटाचे मदन चौधरी,गोपाल काबरा,रमेश लव्हंडे,ओम राठौर,सुधीर पांडे,कमल कोठारी,सतिष देव,मिलींद गिते, रविंद्र पुरोहीत , शिवभगवान तोष्णीवाल,रमेश शर्मा,पुरुषोत्तम तोष्णीवाल ईत्यादिंनी मोलाचे सहकार्य केले.
Comments
Post a Comment