मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहतूकधारकांची तारांबळ पोलिस अधिाऱ्याकडून योग्य नियोजन करीत वाहतूक सुरळीत.
मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहतूकधारकांची तारांबळ पोलिस अधिाऱ्याकडून योग्य नियोजन करीत वाहतूक सुरळीत.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शिरोली नागाव प्रतिनिधी
अमित खांडेकर
-----------------------------------------
आज बुधवार दिवसभर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीच्या कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला. आज पुन्हा एकदा दिवसभर पावसाचा जोर वाढला आहे. तसेच महामार्गाचे काम चालू असल्यामुळे सेवा रस्ते अपुरे पडत आहेत.त्यात भरीत भर म्हणून महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर वाहने बंद पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या आहेत. तसेच सेवा रस्त्यावर आलेले पाणी व अस्ताव्यस्त पार्किंग केलेल्या गाड्या यामुळे महामार्गावर मोठा वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला. विशेष करून तावडे हॉटेल ते वाठार या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात 1 तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झालेली दिसून आली. *या घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी हे स्वतः भर पावसामध्ये आपल्या सहकाऱ्यासोबत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. नागाव फाटा येथे ॲम्बुलन्स आली असता मोठी कसरत करून या गिरी यांनी ॲम्बुलन्स ला वाट करून दिली* *हज यात्रेवरून आलेल्या भाविकांना ही वाहनातून उतरणेस मदत करून देत सेवा बजावत तब्बल दोन तास रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत केली* *तसेच सांगली फाटा येथील उड्डाणपुलावर गाडी बंद पडल्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती. पण पोलिसांना जाग्यावर जाता येत नसल्यामुळे अक्षरशः दोन किलोमीटर चालत जाऊन त्यांनी वाहतूक सुरळीत करून दिली* या जोरदार पावसामुळे वाहनधारकांचा मोठी तारांबळ झाल्याचे व तसेच जनजीवनावरही मोठा परिणाम झालेला दिसून आला.
Comments
Post a Comment