हद्दवाढीला विरोध करण्यासाठी पुलाची शिरोली गाव बंद.
हद्दवाढीला विरोध करण्यासाठी पुलाची शिरोली गाव बंद.
--------------------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
--------------------------------------------
कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीला विरोध करण्यासाठी पुलाची शिरोली व नागाव गावातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले.
कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीत हातकणंगले व करवीर तालुक्यातील सुमारे १९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पण महानगरपालिका कोल्हापूर शहरात नागरीकांना अत्यावश्यक सेवा सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे. फक्त महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने हद्दवाढीचा घाट घातला जात आहे. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत फंडातून सर्व नागरी सेवा सुविधा देण्यास सक्षम आहोत. त्यामुळे या राक्षशी हद्दवाढीला विरोध करण्याचा निर्णय उचगाव येथील सर्व पक्षीय पदाधिकार्यांनी घेतला होता. त्याअनुषंगाने रविवारीपुलाची शिरोली व नागाव गावबंद ठेवून हद्दवाढीला तिव्र विरोध दर्शवण्यात आला.
रविवारी संपूर्ण गावबंद मध्ये सहभागी झालेले नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, लहान मोठे उद्योजक या सर्वांचे शिरोली सरपंच सौ. पद्मजा करपे व नागाव सरपंच सौ. विमल शिंदे यांनी आभार व्यक्त केले.
जत्रेचे स्वरुप.....
रविवारी पंचगंगा पाणी पुरवठा संस्थेची निवडणूक होती.शाहू आघाडी व महाडिक आघाडीचे उमेदवार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली होती.त्यामुळे मराठी शाळेला जत्रेचे स्वरुप निर्माण झाले होते.
Comments
Post a Comment