एसटीचा वाहक अरेरावी करतो, शिवशाही सतत बंद पडते, आता सांगा थेट विभाग नियंत्रकांना.

 एसटीचा वाहक अरेरावी करतो, शिवशाही सतत बंद पडते, आता सांगा थेट विभाग नियंत्रकांना.

---------------------------------------

मिरज कुपवाड प्रतिनिधी

 राजू कदम 

---------------------------------------

सांगली.  प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्यासाठी प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन घेण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. या दिवशी एसटीचे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांशी संवाद साधतील. त्यांचा तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी उपयोजना करतील. यातून प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्याचा एसटीचा प्रयत्न आहे. प्रवासी, संघटना, शाळा, महाविद्यालये यांना आपल्या समस्या, तक्रार, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी दहा ते दोन या वेळेत मांडता येईल. 

त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील. राज्यभरात एसटी दररोज सुमारे 54 ते 55 लाख प्रवाशांचे वाहतूक करते. या दरम्यान अनेकदा प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. 

स्वच्छ स्थान ,गलिच्छ प्रसाधनगृहे, वाहकाचे अरेरावी, बंद पडणाऱ्या गाड्या, धाब्यावरील हॉटेलमध्ये महागडी सेवा या सार्वत्रिक तक्रारी आहेत. गाडी प्रयत्न सुटणे किंवा एनवे रद्द होणे हा अनुभवही वारंवार येतो. 

विशेषता शिवशाही बद्दल तक्रारी सर्वाधिक आहेत. या सर्व तक्रारी आता थेट विभाग नियंत्रणा समोर मांडता येतील.

मध्यवर्ती कार्यालय ठेवणार लक्ष प्रवासी राजा दिन कोणत्याही दिवशी कोणत्या आगारात होईल याचे वेळापत्रक विभाग नियंत्रण वेळोवेळी जाहीर करतील. 

प्रत्येक लेकी तक्राराची नोंद ठेवण्यात येणार आहे. 

त्यावर काय कार्यवाही केली याची नोंद ठेवली जाईल त्यावर थेट मध्यवर्ती कार्यालयाचे लक्ष असेल. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे....

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.