उत्तमचंद बगडीया महाविद्यालय रिसोड येथे डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी संपन्न.

 उत्तमचंद बगडीया महाविद्यालय रिसोड येथे डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी संपन्न.

-----------------------------------------

 रिसोड प्रतिनिधी 

रणजितसिह ठाकुर

-----------------------------------------

स्थानिक उत्तमचंद बगडीया महाविद्यालय रिसोड येथे डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनोद कुलकर्णी सर व प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले प्रा.संदीप जुनघरे सर,प्रा निलेश बाजड सर व प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या प्रा पुजा पाठक मॅडम.या सर्वांनी डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर अधिक प्रकाश टाकला या कार्यकमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनोद कुलकर्णी सर यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनाबद्दल सखोल माहिती दिली व या कार्यक्रमा मध्ये अनेक विद्यार्थांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केलेत तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धोंगडे या विद्यार्थाने केले तर आभार प्रदर्शन कु मोहिनी बनकर या विद्यार्थीनीने केले.हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी प्रा विनोद राऊत सर,प्रा राम जुनघरे सर,प्रा आकाश देशमुख सर,प्रा श्वेता बाजड मॅडम,प्रा अमर साबळे सर,श्री संतोष घुगे श्री सुनील चऱ्हाटे इत्यादी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले व या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.