जिल्हा पोलिस अधीक्षक पंंडित यांची बदली करा -महाविकास आघाडी.
जिल्हा पोलिस अधीक्षक पंंडित यांची बदली करा -महाविकास आघाडी.
--------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
पांडुरंग फिरंगे
----------------------------------
कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित यांच्या कार्रकाळात कोल्हापूर येथे समाधानकारक कामकाज झालेले नाही. तसेच विशाळगड येथे झालेल्या जाळपोळ मध्ये कामात हालगर्जीपणा केला यामुळे दंगल घडली यामुळे पंडित यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्री यांना कळविण्यात येणार असल्याचे आम.सतेज पाटील यांनी सांगितले.
छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीत गुण्यागोविंदाने सगळे रहात आहेत. कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक महिन्द्र पंडित हे हजर झाल्यापासून कोणतेहि ठोस उपाययोजना केल्या नाहीत. तसेच विशाळगड येथे १४ जुलैला झालेल्या आंदोलनात जाळपोळ, घरांची पडझड व दगडफेक झाली. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण दुषित निर्माण झाले.
१४ जुलैच्या आगोदरच प्रशासनाने गडावर प्रवेश बंदी घालण्यात आली असती तर हा प्रसंग उदभवला नसता.
कोल्हापूर जिल्ह्यात मिसिंग प्रकार असतील, खूण, मारामारी,दरोडा आदी घटना वाढल्या आहेत.याकडे दुर्लक्ष करून काही पोलीस कर्मचारी हप्ते, बक्षिसे मिळवण्यासाठी गुंग झाले आहेत. शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या लोकांना पोलीस चांगली वागणूक मिळत नसल्याचे काहींनी सांगितले.
आदी गैरकारभार सुरु असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण दिवसेंदिवस गढूळ होत चालले आहे. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक महिंन्द्र पंडित यांची बदली करण्यात यावी अशी मागणी महाविकास आघाडी कडून होत आहे.
Comments
Post a Comment