आई वडिलांचे मार्गदर्शन घेतल्यास अपराध घडणार नाहीत : न्यायमूर्ती डी.एस. परवाणी कोडोलीत कायदेविषयक जनजागृती शिबीर.

 आई वडिलांचे मार्गदर्शन घेतल्यास अपराध घडणार नाहीत : न्यायमूर्ती डी.एस. परवाणी कोडोलीत कायदेविषयक जनजागृती शिबीर.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

हातकणंगले प्रतिनिधी

विनोद शिंगे

----------------------------------

यशस्वी जीवनात काय चांगले काय वाईट याचा अनुभव वडिलधाऱ्यांना असतो त्यामुळे प्रत्येक तरुणांनी आई वडीलांचे मार्गदर्शन घेतल्यास स्वःताच्या जीवनात अपराध घडणार नाहीत असे प्रतिपादन पन्हाळा न्यायालयाचे न्यायमूर्ती डि.एस. परवाणी यांनी केले.

कोडोली ता.पन्हाळा येथे कोडोली हायस्कूलच्या सभागृहात दिवाणी व फौजदारी न्यायालय पन्हाळा, तालुका विधी सेवा समिती,वकील बार असोसिएशन पन्हाळा कोडोली ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कायदेविषयक जनजागृती शिबीरामध्ये न्यायमूर्ती परवाणी मार्गदर्शन करताना बोलत होते.

देशात प्रामुख्याने सतत घटना घडत जातात घडणाऱ्या घटनेचा परिणाम लक्षात घेऊन कायदे बदलत असतात त्यामुळे तरुणांनी चुकीचे कृत्य करण्यापूर्वी कायद्यांमुळे होणाऱ्या परिणामांचे भान ठेवून वागल्यास जीवन यशस्वी होईल   असे न्यायमूर्ती  डी. एस. परवाणी यांनी सांगून पोक्सोसह इतर कायदे काय आहेत त्याचे  कसे परिणाम घडून येतात याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड. शिवाजी पाटील,  सदस्य ॲड.एन.सी. खामकर, विधी सेवा समितीचेअँड. विश्वास पाटील,

 यांनी भांडण मारामारी, कौटुंबिक वाद,पतीपत्नी मधील वाद, बालवयातील अपराध, सामूहिक अपराध,महिलांवर होणारे अत्याचार याबाबत दाखल होणारे खटले, कायद्याने होणाऱ्या शिक्षा याचा कुटुंबावर होणारा परिणाम स्वःताच्या जीवनात होणारे नुकसान याबाबत उपस्थितांना तसेच शालेय मुला मुलींना योग्य मार्गदर्शन केले.    

           तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय बजागे यांनी स्वागत केले. सदस्य उदयसिंह पाटील यांनी प्रास्ताविकात कोडोली तंटामुक्त समितीचे कार्याचा आढावा घेतला.

सरपंच स्वाती हराळे,उपसरपंच माधव पाटील,ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण,कोडोली विभाग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य पाटील, तंटामुक्त समितीचे सदस्य अशोक पाटील,संभाजी कदम मारुती इंदुलकर,सलीम आंबी,डॅनियल काळे, तबरेज मुल्ला आदी उपस्थित होते.  सूत्रसंचालन गीतांजली केकरे यांनी केले माजी उपसरपंच अशोक भोसले यांनी आभार मानले. 

..........................................

फोटो ओळ 

कोडोली ता.पन्हाळा येथे तंटामुक्त समितीच्या वतीने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिर प्रसंगी बोलताना पन्हाळा न्यायमूर्ती डी.एस.परवाणी यावेळी अँड. शिवाजी पाटील,अँड. विश्वास पाटील,संजय बजागे,अजिंक्य पाटील

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.