सततच्या मुसळधार पावसाने शेतीची कामे ठप्प.

 सततच्या मुसळधार पावसाने शेतीची कामे ठप्प.

--------------------------------------

रिसोड प्रतिनिधी 

 रणजीत सिंह ठाकुर 

--------------------------------------

            परिसरात गेल्या आठ दिवसापासून पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांची सर्व शेतीची कामे खोळंबली असून रिसोड सह परिसरात अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे.

      यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्यामुळे पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, त्यानंतर परिसरात २२ जून पासून आद्रा नक्षत्रातील पावसाने हजेरी लावली होती. २२ ते २७ जून पर्यंत पावसाने सतत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर, मिरची या प्रमुख पिकांची लागवड केली होती, पावसाने साथ दिल्याने पिकेही अंकुरली होती, त्यामुळे यावर्षी परिसरात सर्व पिके चांगल्या स्थितीत दिसत आहे. दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी सात ते आठ दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसाने परिसरातील अनेक भागातील बहरलेली पिके चांगल्या अवस्थेत असून परिणामतः सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील फवारणी, डवरनी, निंदन ही कामे ठप्प आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नाले तुडुंब भरले नसले तरी पावसामुळे अनेक रस्त्याची चाळण झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून असल्याने रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे तर अनेक शेतात पावसाचे पाणी साचून आहे. परिसरात अनेक रस्त्यावर पाणी साचून असल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहे. या मार्गावरून येजा करणारे प्रवासी व गावकरी जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.