सांगलीत गुंड म्हंमद्याच्या साथीदारावर खुनी हल्ला. शिवीगाळ केल्याच्या रागातून कृत्य.

 सांगलीत गुंड म्हंमद्याच्या साथीदारावर खुनी हल्ला. शिवीगाळ केल्याच्या रागातून कृत्य.

--------------------------------

मिरज कुपवाड  प्रतिनिधी

 राजू कदम 

--------------------------------

सांगली गुंड मोहमद्या नदाफचा साथीदार आणि मोका तील संशयित मोहसीन  आलम पठाण (वय 32, रा. कत्तलखाना रस्ता, गणेश नगर) यांने एका कुटुंबातील सदस्यांना धमकावून शिवीगाळ केल्यामुळे त्याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. शुक्रवारी रात्री श्याम नगर येथे हा प्रकार घडला. हल्ल्यात मोसिन गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सलमान रियाज मुजावर, सर्वांचे आई, इरफान मुजावर, आयान मुजावर, हाजीलाल मुजावर, इरफान चे वडील रियाज, (सर्व रा शामनगर, सांगली)

याच्या विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोहसीन पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुंड म्हमद्या नदाफच्या टोळीत तो सहभागी होता. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरुद्ध मोक्काची कारवाई झाली होती. त्यात तो जामिनीवर बाहेर आला आहे. त्यामुळे तो कोल्हापुर शहरात राहण्यास आहे गणेश नगर येथे त्याचे आई राहते. शुक्रवारी तो सांगलीत आला होता. सायंकाळच्या सुमारास शंभर फुटी रस्त्यावरील एका चौकात थांबला होता. त्यांनी मित्र  सलमान याला फोन केला. त्यावेळी सलमान याचे आई फोन घेतला. सलमानच्या आईने त्याला फोन का केलास म्हणत शिवीगाळ केली. त्याचा मोहसीन राग आला. जाब विचारण्यासाठी तो रात्री सलमानच्या घरी कोयता घेऊन गेला. 

मोहसिनने घरी येऊन शिवीगाळ करत जाब विचारला. घरात सलमान, सलमानच्या आई, आयान मुजावर, चुलत भाऊ इरफान मुजावर, हजीलाल मुजावर, इरफान चे वडील रियाज होते. संशयित्ताने त्याला घराबाहेर नेले. तेथे जोरदार वादावादी झाली. तेव्हा संशयतांनी चाकू एडक्याने मोहसिनच्या डोक्यात वार केला. वर्म घाव बसल्याने तो रक्तबंबळ झाला. त्यानंतर तो पळत सिविल हॉस्पिटल परिसरात धावत गेला. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री अकराच्या सुमारास एका इमारतीत लपून बसलेल्या मोहसिनला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याच्या डोक्यात, गालावर झाले आहेत. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यावेळी सिव्हिल परिसरा मध्ये रात्री नंतर गर्दी जमली होती. पोलिसांनी जखमी मोहसीन चा जबाब घेऊन सहा जनाविरुद्ध बी एन एस 109 आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोहसीनवरही खुनी हल्ल्याचा गुन्हा 

खुनी हल्ल्यातील जखमी मोहसीन यांच्याविरुद्धही खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान रियाज मुजावर यांने याबाबत फिर्याद दिली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास मोहसीन घरी आला होता. त्यांनी फोन का उचलत नाही, माझ्याबरोबर बोलत का नाहीस, तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत कोयत्याने भुवईवर, डोक्यात, हातावर वार केला असे फिर्यादीत म्हटल्या आहेत..

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.