अल्पसंख्यांक कार्यकर्त्याच्या स्मृतीसाठी श्रम पुरस्कार देणं हाच श्रमाचा सन्मान ; कॉ.संपत देसाई.
अल्पसंख्यांक कार्यकर्त्याच्या स्मृतीसाठी श्रम पुरस्कार देणं हाच श्रमाचा सन्मान ; कॉ.संपत देसाई.
--------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
----------------------------------
श्रमिकांच्या हक्कासाठी झगडणाऱ्या अत्यंत सामान्य व अल्पसंख्यांक कार्यकर्त्याची स्मृती श्रमगौरव पुरस्कार देवून साजरी होते हा समग्र कष्टकऱ्यांच्या श्रमाचा विजय आहे असे गौरवोद्गार कॉ संपत देसाई यांनी काढले.
मुरगुड ता. कागल येथे कॉ.अनंत बारदेसकर स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या श्रम गौरव पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे बोलत होते. कॉ. संतराम पाटील अध्यक्षस्थानी होते.
समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगूड यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यंदाचा "श्रम गौरव" पुरस्कार देवून कृष्णात गणपती कांबळे यांना गौरवण्यात आले.मुरगूड नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी असणाऱ्या कृष्णात यांना सचोटी, प्रामाणिकपणा सेवाभाव व समर्पण वृत्तीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला त्यांना मानपत्र आणि 5000 रू रोख सपत्नीक गौरवण्यात आले.यावेळी कॉ. देसाई यांनी शब्दबध्द केलेले "एका लोकलढ्याची यशोगाथा' हे पुस्तक शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले याबद्दल त्यांचा प्रबोधिनीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कॉ.देसाई म्हणाले,"
पाणी,जंगले,जमिनी,निसर्ग संसाधने विकणारे शासन माणसाचं जगणं चिरडत असताना लोक गप्प का ? शोषणाची जाणिवच नष्ट होणे हा सामाजिक आंदोलनातील अडसर आहे.विज्ञान तंत्रज्ञानामुळे श्रम विभागणी व्यवस्था बदलत आहे.पण अंतरंगातील चिकटलेली मनूवृत्ती काढण्याचे काम प्रबोधन चळवळीस करावे लागेल."
अध्यक्षस्थानी बोलताना कॉ.संतराम पाटील यांनी सोशल मीडियातून आभासी पद्धतीने जगण्याचे प्रश्र्नांशी लढणे व प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढणे यात फरक आहे रस्त्यावर लढून आंदोलनाच्या यश अपयशाची चर्चा करावी असे आवाहन त्यांनी केले.प्रबोधिनीचे अध्यक्ष बबन बारदेसकर यांचे मनोगत झाले.
स्वागत बी एस खामकर,प्रास्ताविक डी.डी. चौगले,सूत्रसंचालन व आभार समीर कटके यांनी मानले.
या कार्यक्रमास दलितमित्र डी.डी.चौगले दलित मित्र एस आर बाईत,एम.टी.सामंत,शिवाजी सातवेकर पी.आर.पाटील,सिकंदर जमादार,महादेव वागवेकर,विलास वागवेकर,मलगोंडा पाटील,सचिन सुतार,भीमराव कांबळे,मोहन कांबळे,भिकाजी कांबळे,जयवंत गोंधळी,पांडुरंग चांदेकर,अशोक साळोखे,सर्जेराव भाट उपस्थित होते.
Comments
Post a Comment