स्व. लक्ष्मीबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्था वाशिम तर्फे वृक्षारोपण.

 स्व. लक्ष्मीबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्था वाशिम तर्फे वृक्षारोपण.

----------------------------------

रिसोड प्रतिनिधी

रणजीतसिह ठाकुर

----------------------------------

रिसोड,मोप- वाशिम येथील स्व. लक्ष्मीबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्था तर्फे आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी बुलढाणा जिल्ह्या व लोणार तालुक्यातील  वडव  येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. 

सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष श्री हरिदास बाजड हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हिरडव केंद्रप्रमुख श्री मुंढे सर, जिल्हा परिषद शाळेतील श्री ठोंबरे सर, गबाळे मॅडम, काळे मॅडम, श्री नागरे सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 

वृक्षवल्ली आम्हा सोयरे या म्हणीप्रमाणे आजच्या असंतुलित झालेल्या पर्यावरणाला संतुलित करण्याचे उद्देशाने झाडे लावणे हा एकमेव त्यावर उपाय आहे. भविष्यातील वाढते तापमान यावर निर्बंध घालण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे हा उद्देश समोर ठेवून संस्थेच्या वतीने लोणार तालुक्यातील वडव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये व इतर परिसरामध्ये संस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . संस्थेच्या वतीने अनेक टिकाऊ व दर्जेदार झाडे लावण्यात आली. सदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रप्रमुख श्री मुंढे सर यांनी मार्गदर्शन करत असताना झाडे लावणे ही काळाची गरज असल्याचे सांगून यावर्षी उन्हाळ्यामध्ये वाढलेले तापमान हे चिंताजनक असून यावर एकमेव उपाय म्हणजे प्रत्येकाने झाडे लावणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषद शाळेतील उपस्थित असलेल्या इतर शिक्षकांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे कोषाध्यक्ष श्री बाजड यांनी संस्था मागील दोन वर्षापासून वाशिम व रिसोड परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करत असून या माध्यमातून पर्यावरण संतुलित  करण्याचा प्रयत्न करत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन पूजा राजगुरू हिने केले तर आभार प्रदर्शन आरती पोळकर हिने केले.

सदर कार्यक्रमाला वढव येथील सुधाकर वाठोरे,दत्ता राजगुरू,जगदीश पौळकर(पोस्टमास्तर वढव)वाठोरे मॅडम(अंगणवाडी से‌वीका वढव) बालाजी सोनुने,मंगल सानप व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.