हातकणंगले तालुक्यातील रुई इंगळी या गावांना पुराचा तडाखा.
हातकणंगले तालुक्यातील रुई इंगळी या गावांना पुराचा तडाखा.
--------------------------------------
हुपरी प्रतिनिधी
जितेंद्र जाधव
--------------------------------------
आठ दहा दिवस सततधार सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीला पूर आला आहे या पुराचा फटका हातकणंगले तालुक्यातील इंगळी आणि रुई या गावांना बसला आहे गावातील अनेक घरात पुराचे पाणी घुसले असून प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रुई येथील सहारा बेकरी जवळ पाणी आल्यामुळे पट्टणकोडोली ही वाहतूक बंद करण्यात आलेले आहे ग्रामपंचायत येथील कर्मचारी गावातील नागरिक सरपंच पोलीस पाटील यांनी रस्त्यावर बॅरिकेट राहून रस्ता वाहतुकीस बंद केला आहे गावातील 30 ते 35 कुटुंबाचे स्थलांतर राजमाने हायस्कूलमध्ये केले आहे तसेच इंगळी गावामध्ये पण पुराचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे 60 ते 70 कुटुंबाचे स्थलांतर सरपंच आणि गावातील नागरिक यांच्या पुढाकारामुळे या लोकांचे स्थलांतर पट्टणकडोली येथील प्राथमिक शाळेमध्ये केले आहे गावातील अनेक जुन्या घरांची पडझड झाली आहे नदीकडेला असलेली सर्व शेती पाण्याखाली गेल्यामुळे ऊस भात भुईमूग सोयाबीन अधिक पिकांचं भरपूर प्रमाणात नुस्कान झाले आहे तसेच अनेकांची घराची पडझड झाल्यामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाण्याचा विसर्ग मात्र वाढत आहे
Comments
Post a Comment