दि. १ ऑगस्ट २०२४ पासून राधानगरी विधानसभा मतदार संघात विकास यात्रेची सुरवात करणार - आमदार प्रकाश आबिटकर.

 दि. १ ऑगस्ट २०२४ पासून राधानगरी विधानसभा मतदार संघात विकास यात्रेची सुरवात करणार - आमदार प्रकाश आबिटकर.

------------------------------------ 

 गारगोटी प्रतिनिधी 

 स्वरुपा खतकर

------------------------------------ 

 राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी आणि सार्वजनिक विकासाच्या मुद्द्यांसाठी आपण केलेल्या प्रयत्नामुळे या मतदारसंघात शेकडो कोटींची विकास कामे व सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य शासनाच्या विविध विभागातून व्यक्तिगत लाभाच्या, सार्वजनिक हिताच्या अनेक योजनांचा लाभ हजारो शेतकरी, तरुण, महिला, जेष्ठ नागरिक व अपंग यांच्यासाठी मंजूर केलेल्या असून या सर्व कामांचा दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी विकास यात्रेची सुरुवात करणार आहोत. या विकास यात्रेमध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणसांना आवश्यक असणारी विविध सार्वजनिक, व्यक्तिगत लाभ योजनांचा शुभारंभ, लोकार्पण व जनसंवाद यात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे, याची सुरुवात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या ''मुख्यमंत्री लाडली माझी बहीण योजनेचा'' शुभारंभ तहसील कार्यालय भुदरगड येथे सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी तिन्ही तालुक्यातील संबंधित अधिकारी यांचे उपस्थितीत आढावा बैठक संपन्न होणार आहे. 


त्याचबरोबर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेत पाणंद रस्ते, जवाहर विहिरी, जनावरांचे गोठे, शाळा संरक्षण भिंती व रेशीम उद्योगास प्रोत्साहन या सर्व कामांची सुरुवात. तसेच पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना व यशवंत घरकुल योजना या माध्यमातून मंजूर करण्यात येणाऱ्या ५००० घरकुलांबाबतही आढावा बैठक तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजना, ७.५० एचपी पर्यंतच्या शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजेअंतर्गत ३ मोफत सिलेंडर योजना या सर्व कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.