समर्थ म्हाकवे यांचे एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारत देशाला रौप्य पदक.

 समर्थ म्हाकवे यांचे एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भारत देशाला रौप्य पदक..

----------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे 

----------------------------------

     पट्टणकडोली ता. हातकणंगले येथील पै. समर्थ गजानन म्हाकवे यांनी जॉर्डन येथे सुरू असलेल्या एशियन चॅम्पियनशिप 2024 या कुस्ती स्पर्धेमध्ये 55 किलो वजनी गटात भारत देशाला रौप्य पदक मिळवून दिले व आपल्या कुटुंबासाहित गावच्या तसेच तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

     हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे मा. आम. डॉ. सुजित मिणचेकर  व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले  यांनी पैलवान समर्थ म्हाकवे याचा अभिनंदन पर सत्कार केला तसेच इथून पुढच्या स्पर्धेकरिता पैलवान समर्थक म्हाकवे याला सर्वोतोपरी मदत देण्याची ग्वाही दिली.

     यावेळी आमच्यासोबत पट्टणकोडोली शहरप्रमुख आण्णासो जाधव, रामदास कुरणे, किसन तिरपणकर, युवासेना तालुकाअधिकारी देवाशिष भोजे, लक्ष्मण पुजारी, निलेश कागले, प्रविण पोवार, सोमनाथ कामाण्णा व म्हाकवे कुटुंबीय आणि इतर शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.