पूर बांधीत भागात पूर ओसरताच स्वच्छता मोहीम जोमाने सुरू.

 पूर बांधीत भागात पूर ओसरताच स्वच्छता मोहीम जोमाने सुरू. 

--------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम 

--------------------------------

सांगली: मधील वार्ड क्र 12, 13 , 14 तर मिरज मधील वार्ड क्र 5 आणि 20 मधील पूर ओसरल्या नंतर लगेच स्वच्छता मोहीम हाती घेण्याचे आदेश मा. शुभम गुप्ता आयुक्त यांनी दिल्या आहेत. सर्व मनपा मधील पूर बांधीत क्षेत्रावर मा. आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्वतः लक्ष केंद्रित केले आहे. पूर पोचल्यावर नंतर कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. अति आयुक्त रविकांत आरसुळे यांच्या नियंत्रणात डॉ रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी ,वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बालगीत, अनिल पाटील यांच्या देखरेख खाली सर्व टीम कार्यरत असणार आहे. 

12 18 स्वच्छता कर्मचारी यांच्या उपलब्धता करून देण्यात येत आहे. स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या साधारणपणे 200 वाहनांच्या वापर  स्वच्छतेसाठी करण्यात येणार आहे, 20 ट्रॅक्टर द्वारे वरील भागात स्प्रिंग करण्यात दोन वेळेस करण्यात येणार आहे, पावडर देखील टाकण्यात येणार आहे. सध्या पाणी पातळी 39.4 अशी असून जस जशी पाणी पातळी कमी होईल तसे तसे स्वच्छता मोहीम तीव्र करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. रविंद्र ताटे यांनी दिली आहे...

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.