शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण.
-----------------------------------
रिसोड(प्रतिनिधी
रणजीत ठाकूर.
-----------------------------------
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर आज दिनांक 01 जुलै 2024 रोजी शाळा नियमित सुरु झाल्या. आज शाळेच्या पहिल्या दिवशी रिसोड येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात आले. या शालेय पुस्तक वितरणाचे नियोजन प्राचार्य संजयराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात व उपप्राचार्य संजयराव नरवाडे यांच्या पुढाकारात ग्रंथपाल श्री बापूसाहेब सरनाईक यांनी केले होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने 5 ते 8 या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके वितरित करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचा पहिला दिवस असल्याकारणाने विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सुरुवातीला पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. दीर्घ सुट्टीनंतर शाळा सुरु झाल्यामुळे आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची किलबिल पुन्हा ऐकायला मिळाली.
Comments
Post a Comment